भाजप महायुतीचा रोड शो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप महायुतीचा रोड शो
भाजप महायुतीचा रोड शो

भाजप महायुतीचा रोड शो

sakal_logo
By

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना भाजप महायुतीने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो करत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. नारायण पेठ, सदाशिव पेठेतून हा रोड शो जाताना फडणवीस यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत केले.
सायंकाळी पाचच्या सुमारास भिडे पूल येथून फडणवीस यांच्या रोड शोची सुरुवात झाली. केसरीवाडा, रमणबाग चौक, शगून चौक, भानुविलास टॉकीज, पेरूगेट, टिळक रस्ता, खनिजा विहिर, बाजीराव रस्त्यावरून महात्मा फुले मंडई असा रो शो करत सदाशिव, नारायण पेठेतील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजपने केला.
उघड्या जीपमधून रोड शोला सुरुवात होताना भाजपचे प्रमुख डझनभर नेते दोन जीपमध्ये होते. फुलांची, रंगबिरंगी कागदांची उधळण फडणवीस, उमेदवार हेमंत रासने, चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर नेत्यांवर करण्यात आली. चौकांत क्रेनला मोठे हार लावून, जेसीबीतून, दुतार्फा असलेल्या इमारतींवरूनही नागरिकांनी फुलांचा वर्षाव केला.
विद्यार्थ्यांनी दिल्या घोषणा
केळकर रस्त्यावरून पीएमपीच्या बसमध्ये शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थिनी येथे होते. त्यांच्या जवळ फडणवीस येताच त्यांनीही मोदी...मोदीच्या घोषणा देण्यास सुरवात केली. फडणवीस त्यांनी या लहान मुलांना प्रतिसाद दिला.
PNE23T26639