पुण्यात चार मार्चपासून गानसरस्वती महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात चार मार्चपासून
गानसरस्वती महोत्सव
पुण्यात चार मार्चपासून गानसरस्वती महोत्सव

पुण्यात चार मार्चपासून गानसरस्वती महोत्सव

sakal_logo
By

पुणे ः गानसरस्वती किशोरी आमोणकर यांना मानवंदना देण्यासाठी आयोजित ‘गानसरस्वती महोत्सव’ यंदा शनिवार ४ मार्च व रविवार ५ मार्च रोजी डी. पी. रस्ता येथील केशवबाग येथे रंगणार आहे. नाट्यसंपदा प्रतिष्ठानचे विश्वस्त पं. रघुनंदन पणशीकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
महोत्सवाचे संयोजक अपर्णा पणशीकर, निखिल जोशी यावेळी उपस्थित होते. पं. संजीव अभ्यंकर, पं. मुकुल शिवपुत्र, ज्येष्ठ गायिका शुभा मुद्गल, पं. रघुनंदन पणशीकर, ज्येष्ठ गायिका डॉ. अलका देव मारुलकर, विदुषी संगीता कट्टी आदींचे गायन, अनिंदो चॅटर्जी यांचे एकल तबलावादन, मिलिंद तुळाणकर यांचे जलतरंग वादन, पं. रूपक कुलकर्णी यांचे बासरीवादन, पं. बुधादित्य मुखर्जी यांचे सतादरवादन याची पर्वणी यंदाच्या महोत्सवात मिळणार आहे. तसेच, ‘नाट्यसंपदा प्रतिष्ठान’तर्फे देण्यात येणारा ‘गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार’ यावर्षी डॉ अलका देव मारुलकर यांना आणि ‘गानसरस्वती किशोरी आमोणकर संगतकार पुरस्कार’ ज्येष्ठ तबलावादक ओंकार गुलवाडी यांना प्रदान करण्यात येणार आहे.