सुविधांबाबत ‘हायटेक’!

सुविधांबाबत ‘हायटेक’!

पुणे, ता. २४ ः प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रणासाठी आता सेन्सरचा उपयोग केला जाणार आहे. त्यासाठी पुणे विमानतळावर पहिल्यादांच ‘पीएफएमएस’चा (पॅसेंजर फ्लो मॅनेजमेंट सिस्टिम) वापर होईल. यासह बॅगेजच्या कटकटीपासून सुटका होण्यासाठी देखील इन लाइव्ह बॅग्ज प्रणालीचा वापर होणार आहे. यासह अन्य सुविधा प्रवाशांना येत्या काही महिन्यांत पुणे विमानतळ उपलब्ध होणार आहे. प्रवासी सुविधांच्या बाबतीत पुणे विमानतळ हायटेक होत आहे. मात्र, याचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना जूनपर्यंत वाट पहावी लागणार आहे.
पुणे विमानतळाच्या ६० हजार चौरस फुटांच्या क्षेत्रांवर उभे राहत असलेल्या नव्या टर्मिनल इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या ठिकाणी प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा दिली जाणार आहे. देशात काही खासगी विमानतळांवर जी सुविधा पुरवली जात आहे. तीच सुविधा पहिल्यादांच पुणे विमानतळांवर उपलब्ध केली जात आहे. जूनपासून नव्या टर्मिनसच्या इमारतीमधून विमानसेवा सुरु केली जात आहे. त्याचा थेट फायदा प्रवाशांना होणार आहे. नव्या इमारतीमुळे प्रवाशांची संख्या व विमानाची संख्या वाढण्यास मदत होणार आहे.

तीन पुलाच्या साह्याने टर्मिनल जोडणार
पुणे विमानतळाच्या सध्या प्रचलित असलेल्या टर्मिनलला नव्या टर्मिनलला जोडण्यासाठी तीन स्तरांवर पूल (ब्रिज) बांधले जाणार आहे. त्याच्या कामाला सुरवात देखील झाली आहे. तळमजला, पहिल्या मजल्यावर एअर साइड कॉरिडॉर व सेक्युरिटी होल्ड असे दोन स्तरांवर ब्रिज बांधले जाणार आहे. अशा प्रकारे तीन पुलाच्या माध्यमातून दोन्ही टर्मिनलला जोडले जात असल्याने प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणे जाणे सोपे होणार आहे. याच्या कामाला सुरवात झाली असून मेअखेर काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. सुमारे ११ मीटर या पुलाची लांबी असेल.

कसे आहे नवे टर्मिनल?
क्षेत्रफळ : सुमारे ६० हजार चौरस फूट
प्रवासी क्षमता : वर्षाला एक कोटी २० लाख
एरोब्रिज : ५
एकूण खर्च : ५२५ कोटी

काय मिळणार सुविधा?
प्रवाशांना नव्या सुविधा या केवळ नव्या टर्मिनल इमारतीमध्ये दिल्या जातील.
१. चेक इन काउंटरजवळ प्रवाशांची गर्दी क्षमतेपेक्षा जास्त झाली तर तिथे बसविलेल्या सेन्सरमुळे याची तत्काळ माहिती वरिष्ठापर्यंत पोचेल. त्यामुळे प्रवाशांनी तक्रार करण्याची अथवा कोणी रिपोर्ट करण्याची गरज नाही. तत्काळ त्यावर अंमलबजावणी करणे शक्य होणार आहे.
२. प्रवाशांच्या बॅगेज चेक करण्यात आता बराच वेळ जातो. त्यासाठी दुसरी रांग करून त्यात थांबावे लागते. नव्या इन लाइव्ह बॅग्ज प्रणालीमुळे प्रवाशांना केवळ बॅगसाठी वेगळी रांग लावावी लागणार नाही. या प्रणालीमुळे एक्स रे मशिनमधून बॅगेज बेल्टवर नेण्यासाठी प्रवाशांना जावे लागणार नाही. हे काम नवीन मशिन करेल. परिणामी प्रवाशांच्या वेळेत बचत होईल.
३. फूड कोर्ट
४. प्रवाशांना आराम करण्यासाठी लाउंज यात एक कर्मशियल लाउंजचा देखील समावेश असणार आहे.
५. कार्बन फूट प्रिंट कमी करण्यासाठी विमानतळावर स्काय लाइटचा वापर.
६. लहान मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था.
७. रेस्टॉरंट.

नव्या टर्मिनल इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या एरोब्रिज जोडण्याचे काम सुरु आहे. मे अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण होऊन जून पासून नवे टर्मिनल प्रवाशांच्या सेवेत येईल.
- गगन मलिक, सरव्यवस्थापक, (नवे टर्मिनल ), पुणे विमानतळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com