Tue, March 21, 2023

छोट्या व्यावसायिकाकडून मतदानासाठी जनजागृती
छोट्या व्यावसायिकाकडून मतदानासाठी जनजागृती
Published on : 25 February 2023, 2:28 am
पुणे, ता. २५ : लोकसभा, विधानसभा निवडणुकांवेळी मतदारांमध्ये जनजागृती करणाऱ्या बापूराव गुंड यांनी कसबा व चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतही मतदार जनजागृतीचे काम सुरू ठेवले आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून गुंड यांनी दोन्ही मतदारसंघांमध्ये जाऊन पोटनिवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले. गुंड यांचा फुरसुंगी येथे कपड्यांचा छोटा व्यवसाय आहे. समाजशास्त्र विषयात एमए करून त्यांनी आतापर्यंत ६ पुस्तके लिहिली आहेत. हे काम करीत असतानाच गुंड हे प्रत्येक निवडणुकीच्यावेळी मतदारांमध्ये जनजागृती करण्यावर भर देतात. ‘‘मतदारांनी निर्भिडपणे मतदान करावे, कोणत्याही आमिषाला बळी पडू नये’’ यासाठी आपण मतदार जनजागृतीवर भर देत असल्याचे गुंड यांनी सांगितले.