Sat, March 25, 2023

पटोले प्रतिक्रिया
पटोले प्रतिक्रिया
Published on : 25 February 2023, 7:03 am
मंत्री, पोलिसांच्या संरक्षणात पैसेवाटप झाल्याचे व्हीडिओ समोर आले आहेत. निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी. रवींद्र धंगेकर यांना लोकांमध्ये जायला सांगितले आहे. मी सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. लोकांना विकत घेऊन आम्ही जिंकू, अशा मानसिकतेने भारतीय जनता पक्षाचे सध्या काम सुरू आहे. नुकत्याच झालेल्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांमध्ये भाजपला लोकांनी नाकारले आहे. या पोटनिवडणुकीतही दोन्ही ठिकाणी आमचे उमेदवार जिंकतील, असा मला विश्वास आहे.
- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस