पुणे विमानतळावर पूर्ण क्षमतेचे मेडिकल युनिट असावे ः वंडेकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे विमानतळावर पूर्ण क्षमतेचे 
मेडिकल युनिट असावे ः वंडेकर
पुणे विमानतळावर पूर्ण क्षमतेचे मेडिकल युनिट असावे ः वंडेकर

पुणे विमानतळावर पूर्ण क्षमतेचे मेडिकल युनिट असावे ः वंडेकर

sakal_logo
By

पुणे, ता. २६ ः पुणे विमानतळ सुविधांबाबत जागतिक दर्जाचे होण्याचे प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे विमानतळांवर वैद्यकीय सुविधांची वानवा आहे. सध्या केवळ प्रथमोपचाराची सोय आहे. प्रवाशांना आपत्कालीन स्थितीत वैद्यकीय मदत लागली तर त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका आहे. मात्र, पुणे विमानतळावर पूर्ण क्षमतेचे मेडिकल युनिट असणे गरजेचे आहे. प्रवाशांसाठी अशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, अशी मागणी हवाई वाहतूक तज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी केली.

पुणे विमानतळावरून रोज सुमारे १९० विमानांतून सुमारे तीस हजार प्रवाशांचा प्रवास होतो. उन्हाळ्यात प्रवासी व विमानांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. देशांतील पहिल्या १० विमानतळात पुणे विमानतळाचा समावेश होतो. पुणे हे जागतिक दर्जाचे शहर असल्याने येथे येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. मात्र, येथे प्रवाशांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीत, हे चिंताजनक आहे. याआधी दोन विमानतळाच्या कर्मचाऱ्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. तशी आपत्कालीन परिस्थिती पुन्हा निर्माण झाली तर प्रथमोचाराने तो वाचणार आहे का? असा सवाल वंडेकर यांनी विमानतळ प्रशासनाला विचारला आहे. शिवाय तत्काळ क्षमतेने मेडिकल युनिट सुरू करावे अशी मागणीही केली आहे.

या सुविधा उपलब्ध असणे गरजेचे
- पुणे विमानतळावरील वैद्यकीय केंद्र हे सुविधांनी व प्रशिक्षित मनुष्यबळाने सज्ज असावे.
- गोल्डन अवर ध्यानी ठेवून सुविधा निर्माण केल्या पाहिजेत.
- कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध असणे गरजेचे आहे.
- वैद्यकीय सुविधांची माहिती पोहोचण्यासाठी तेथील संपर्क क्रमांक गरजेच्या ठिकाणी प्रदर्शित केला पाहिजे.