मधुमेहासाठी ‘आरएसएसडीआय’ घेणार शंभर गावे दत्तक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मधुमेहासाठी ‘आरएसएसडीआय’ घेणार शंभर गावे दत्तक
मधुमेहासाठी ‘आरएसएसडीआय’ घेणार शंभर गावे दत्तक

मधुमेहासाठी ‘आरएसएसडीआय’ घेणार शंभर गावे दत्तक

sakal_logo
By

पुणे, ता. २७ : मधुमेहाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या ‘रिसर्च सोसायटी फॉर द स्टडी ऑफ डायबेटिस इन इंडिया’ (आरएसएसडीआय) ही संस्था आता देशातील शंभर गावे दत्तक घेण्याच्या प्रक्रियेत आहे. गावे दत्तक घेऊन त्यांना मधुमेहाचे उपचार, त्याचे चांगले व्यवस्थापन कसे करावे, लठ्ठपणाची तपासणी, गावकऱ्यांमध्ये असलेला रक्तदाब, याबरोबरच असंसर्गजन्य आजारांबाबत गावकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याबरोबर संस्थेच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे उपचार सुरु करण्याचे नियोजन आहे. संस्थेने हा उपक्रम रोटरी इंडिया या संस्थेच्या माध्यमातून राबविण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमाचे नेतृत्व ‘आरएसएसडीआय’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. ब्रीजमोहन मक्कर, राष्ट्रीय सचिव डॉ. संजय अग्रवाल, कार्यकारिणी सदस्य डॉ. अमित गुप्ता, डॉ. राकेश सहाय, डॉ. वसंत कुमार हे याचे नियोजन करीत आहेत.