Wed, March 29, 2023

‘पाटील यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करा’
‘पाटील यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करा’
Published on : 1 March 2023, 2:17 am
पुणे, ता. २८ : महापुरुषांच्या बदनामी प्रकरणात काँग्रेसच्या कार्यकर्त्याला अटक केल्याप्रकरणी न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढत २५ हजार रुपयांचा दंड केला. सरकारवर ही वेळ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अरेरावीमुळे आली. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी
यांनी केली. पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व जोतिराव फुले यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते संदीप कुदळे यांच्यावरील गुन्हा उच्च न्यायालयाने रद्द केला. तसेच कुदळे यांना चुकीच्या पद्धतीने अटक केल्याबद्दल न्यायालयाने राज्य सरकारला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.