Thur, March 30, 2023

गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात
राष्ट्रवादीचे आंदोलन
गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन
Published on : 1 March 2023, 1:55 am
पुणे, ता. १ ः केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडर ५० रुपयांनी आणि व्यावसायिक सिलिंडरची किंमत ३५० रुपयांनी वाढविण्यात आली आहे, याविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. या वेळी केंद्र सरकारचा निषेध करत ही दरवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली. पुणे-सातारा रस्त्यावर सिटीप्राइड चौकात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मृणालिनी वाणी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. विभागीय महिला अध्यक्षा वैशाली नागवडे, बाळासाहेब अटल, संतोष नांगरे, सागरराजे भोसले, शशिकला कुंभार, पूनम पाटील, स्वाती चिटणीस, दिलशाद अत्तार, सुशांत ढमढेरे, सतीश वाघमारे, दिलीप अरुंदेकर, समीर पवार, सोनाली उजागरे, वर्षाराणी कुंभार आदी उपस्थित होते.