गीता धर्म मंडळाला सुधीर मुनगंटीवार यांची भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गीता धर्म मंडळाला 
सुधीर मुनगंटीवार यांची भेट
गीता धर्म मंडळाला सुधीर मुनगंटीवार यांची भेट

गीता धर्म मंडळाला सुधीर मुनगंटीवार यांची भेट

sakal_logo
By

पुणे, ता. २ ः ‘‘भगवद्‍गीतेतील संदेश पुढील पिढ्यांपर्यंत नेण्याचे ईश्वरी कार्य गीता धर्म मंडळ करीत आहे. हे कार्य पुढे नेण्यासाठी शासन सर्व ते सहकार्य करेल. मंडळाच्या संदर्भ ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रंथांचे डिजिटलायझेशन व्हावे. भारतीय अध्यात्मात आणि संस्कारात प्रगतीची बीजे आहेत. त्यामुळे देशातील सर्व भाषांतील चांगले धार्मिक साहित्य संकलित करून डिजिटायझेशन करावे. आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घ्यावी त्यासाठी शासनाच्या माध्यमातून आणि सीएसआर निधीतून मदत केली जाईल’’, असे प्रतिपादन वन आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

गीता धर्म मंडळाच्या द्विशताब्दी महोत्सवानिमित्त मुनगंटीवार यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी ते म्हणाले. ‘‘गीता धर्म मंडळाने चांगल्या स्वरातील, शुद्ध शब्दातील भगवद्‍गीता यू ट्यूबवर आणावी, गीता पठणाचा सामूहिक कार्यक्रम गिनीज बुकमध्ये नोंद होईल इतका मोठा आयोजित करावा.’’ या प्रसंगी मुनगंटीवार यांनी मंडळाच्या संदर्भ ग्रंथालयाला आणि विक्री केंद्राला भेट दिली. गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद दातार आणि कार्यकारी मंडळाच्या सदस्यांनी स्वागत केले. गीता धर्म मंडळ ९८ वर्षे भगवद्‍गीता प्रसाराचे कार्य करीत आहे, हे सांगून डॉ. दातार यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. गीता धर्म मंडळाच्या कार्यवाह विनया मेहेंदळे, सहकार्यवाह मुकुंद कोंढवेकर, शताब्दी महोत्सव समितीचे संयोजक राष्ट्रीय कीर्तनकार मोरेश्वर जोशी (चऱ्होलीकर), डॉ. शैलजा कात्रे, प्रीती गंगाखेडकर, अस्मिता घाटे, ऋषी अगरवाल, ॲड. आनंद आकुत, गीतेश जोशी, सागर कुलकर्णी, भाजपचे योगेश गोगावले, गीता संस्था वर्गाच्या शिक्षिका आदी उपस्थित होते.