‘क्रॉस बाईक्स’तर्फे नवी मॉडेल्स बाजारात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘क्रॉस बाईक्स’तर्फे
नवी मॉडेल्स बाजारात
‘क्रॉस बाईक्स’तर्फे नवी मॉडेल्स बाजारात

‘क्रॉस बाईक्स’तर्फे नवी मॉडेल्स बाजारात

sakal_logo
By

लुधियाना, ता. २ ः देशातील आघाडीचा ब्रॅण्ड ‘क्रॉस बाईक्स’ने आपल्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त सायकलींचे १८ नवे मॉडेल्स बाजारात आणल्याची घोषणा केली आहे. यामध्ये एमटीबी, रोड बाईक्स, तसेच महिला व मुलांसाठीच्या सायकलींचा समावेश आहे.
या संदर्भात क्रॉस बाईक्सचे व्यवस्थापकीय संचालक गौरव मुंजाल म्हणाले, ‘‘कंपनी दहाव्या वर्धापनदिनी मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे. हा ब्रॅण्ड आकर्षक रंग आणि स्पोर्टी लुकसाठी विख्यात आहे, तसेच युवकांमध्ये या सायकली विश्‍वासार्हता, दर्जा आणि त्यांच्या फिटनेसच्या प्रवासातील साथीदार म्हणून ओळखल्या जातात. कंपनीने उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी ११० कोटींची गुंतवणूक केली असून, जर्मन तंत्रज्ञानावर आधारित पेंट शॉप आणि इतर आधुनिक तंत्रज्ञान ही त्याची वैशिष्ट्ये आहेत.’’ बाजारात दाखल झालेल्या १८ मॉडेल्सपैकी प्रत्येकी सहा लहान मुले व एमटीबी प्रकारातील आणि प्रत्येकी तीन महिला व रोड बाईक प्रकारातील आहेत.

छायाचित्र ः 28898