कैद बन जाये मोहब्ब्त तो..मोहब्बत से निकल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कैद बन जाये मोहब्ब्त तो..मोहब्बत से निकल
कैद बन जाये मोहब्ब्त तो..मोहब्बत से निकल

कैद बन जाये मोहब्ब्त तो..मोहब्बत से निकल

sakal_logo
By

‘पीएमपीएमल’च्या महिला कंडक्टर्स ‘रोल मॉडेल’

लीड
पुणे महानगर परिवहन महामंडळ प्रायव्हेट लिमिटेडचे (पीएमपीएमल) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी महिला कर्मचाऱ्यांसाठी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्याबाबत जागतिक महिला दिनानिमित्त त्यांची वसुंधरा काशीकर यांनी घेतलेली मुलाखत..


प्रश्न - तुम्ही पदभार हातात घेतल्यावर अनेक निर्णय असे घेतले जे महिलांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे होते, त्याबद्दल काय सांगाल?

उत्तर - ‘पीएमपीएमल’चे नऊ हजार कर्मचारी आहेत. त्यापैकी ४७०४ कंडक्टर्स आहेत. त्यामध्ये २१८ महिला कंडक्टर्स आहेत. या महिला कंडक्टर्स आमच्यासाठी ‘रोल मॉडेल’ आहेत. मी पदभार स्वीकारल्यावर जेव्हा विविध डेपोंना भेट दिली तेव्हा महिला कंडक्टर्सची मागणी होती की, गरोदरपणात आम्हाला लाइट ड्यूटी देण्यात यावी. लाइट ड्यूटी द्यायची असेल तर अट अशी होती की, त्या महिलेने प्रेगन्सी सर्टिफिकेट आणून द्यायला हवे. आणि ते सर्टिफिकेट फक्त ससून हॉस्पिटलचे असेल तरच ग्राह्य धरण्यात येईल. त्यामध्ये आम्ही बदल केला, की ससूनचेच सर्टिफिकेट गरजेचे नाही कुठल्याही डॉक्टरने दिलेले प्रेगन्सी सर्टिफिकेट ग्राह्य धरले जाईल. हा निर्णय दिसताना छोटा दिसला तरी महत्त्वाचा होता. त्यांची आणखी एक मागणी होती, आम्हाला रात्री उशिराची किंवा अगदी सकाळची ड्यूटी देण्यात येऊ नये, आणि हार्ड रुट देऊ नये. त्यासाठी आम्ही त्यांना अशाप्रकारची ड्यूटी न देण्याचा निर्णय घेतला. तसेच गरोदर महिला कंडक्टर्सना गरोदर राहिल्यावर लगेचच लाइट ड्यूटी देण्यात यावी हाही निर्णय घेतला. सतत उभं राहून तिकीट काढणे, बसमध्ये फिरणे यामध्ये थकायला होते. यामुळे महिला कंडक्टर्सना आराम करता यावा म्हणून हिरकणी कक्ष आहेच.

- महिला कंडक्टर्ससाठी तुम्ही फिक्स्ड रुटचा निर्णय कसा घेतला?
- चर्चेनंतर लक्षात आले की, काही रुट्सवर महिलांसाठी शौचालयाची सोय नाही, आणि शौचालय असणे बंधनकारक आहे. शौचालयांअभावी महिलांना युरिन इन्फेक्शनचा त्रास होतो आणि अशी वेळ एखाद्या महिलेवर यावी हे दुर्दैवाचे आहे. मग आम्ही असे रुट्स काढले आणि निर्णय घेतला की ज्या रुट्सवर शौचालय नाहीत ते महिला कंडक्टर्सना देण्यात येणार नाहीत. शौचालयाची सुविधा असलेले रुट्सच महिला कंडक्टर्सना देण्यात येतील.

- ज्या मार्गांवर महिलांसाठी शौचालय नाही त्याचे काय?
- सध्या ४९ मार्गांवर महिलांसाठी शौचालयाची सुविधा आहे तर २९ मार्गांवर सुविधा नाही. त्यामुळे आम्ही पुणे महानगरपालिकेकडे या ठिकाणी महिलांसाठी शौचालय बांधून देण्याची मागणी केली आहे. गुजरवाडीमध्ये ‘पीएमपीएमएल’ने स्वखर्चाने महिलांसाठी शौचालय बांधले. महानगरपालिकेची आकांक्षा योजना आहे त्याद्वारे पण लवकरात लवकर सर्वच मार्गांवर महिलांसाठी शौचालयाची व्यवस्था करणार आहोत.

- तेजस्विनी बस सेवा काय आहे?
तेजस्विनी बससेवा फक्त महिला प्रवाशांसाठी सुरु केलेली आहे. पूर्वी ही सेवा फक्त नऊ मार्गांवर होती आणि त्यात १५ बसेस होत्या. आज ही सेवा २३ मार्गांवर सुरू आहे आणि बसेसची संख्या २८ झाली आहे. या बसमध्ये फक्त महिला वाहक-कंडक्टर्स राहणार आहेत. शिवाय दर महिन्याच्या आठ तारखेला सर्व महिलांना मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून दिली आहे.

- अध्यक्ष म्हणून तुमचे काय निरीक्षण आहे?
- समाजात वावरताना आपण अवतीभवती बघत असतो. महिला घर, मुलं संसार सर्व सांभाळून काम करतात. त्यांना कामासाठी थोडीशी अनुकूल स्थिती निर्माण करून दिली तर त्या देशाच्या विकासात खूप मोठं योगदान देऊ शकतात. त्यादृष्टीने आम्ही संवेदनशील राहून निर्णय घेत आहोत.