शिवाजीनगर बस स्थानकात हिरकणी कक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजीनगर बस स्थानकात हिरकणी कक्ष
शिवाजीनगर बस स्थानकात हिरकणी कक्ष

शिवाजीनगर बस स्थानकात हिरकणी कक्ष

sakal_logo
By

पुणे, ता. ९ ः राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागातील पहिल्या सुसज्ज हिरकणी कक्षाची स्थापना बुधवारी शिवाजीनगर (वाकडेवाडी) बस स्थानकात करण्यात आली. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत या हिरकणी कक्षाचे उद्‍घाटन इनरव्हील रिव्हर साइड क्‍लबच्या अध्यक्षा स्मिता पिंगळे, महाराष्ट्राच्या प्रमुख मुक्ती पानसे आणि शिवाजीनगर आगार व्यवस्थापक ज्ञानेश्‍वर रणवरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी क्‍लबचे सदस्य आणि कर्मचारी उपस्थित होते.

शिवाजीनगर एसटी स्थानकात इनरव्हील रिव्हर साइड क्‍लबच्या मदतीने हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे. यामध्ये एक बेड, पाळणा, ब्लँकेट आणि इतर सुविधा असणार आहेत. स्तनदा मातांना आपल्या बाळाला स्तनपान करताना अडचणी येऊ नये म्हणून या कक्षाची स्थापना करण्यात आली. तसेच महिला वाहकांसाठी विश्रांती गृहामध्ये दोन बेड आणि इतर सामग्री उपलब्ध करून दिली आहे. शिवाजीनगर शिवाय स्वारगेट आणि इतर स्थानकातील हिरकणी कक्षदेखील लवकरच अद्ययावत करण्यात येणार आहे.

स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा पुणे विभागातील पहिला अद्यावत असा हिरकणी कक्ष आहे.
- ज्ञानेश्‍वर रणवरे, वरिष्ठ आगार व्यवस्थापक, शिवाजीनगर बस स्थानक