धम्मसाकच्छा विद्यार्थी परिषद पाडली पार बौद्ध धर्माची आंतरविद्याशाखीय भूमिका ही यंदाची मध्यवर्ती संकल्पना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धम्मसाकच्छा विद्यार्थी परिषद पाडली पार 
बौद्ध धर्माची आंतरविद्याशाखीय भूमिका ही यंदाची मध्यवर्ती संकल्पना
धम्मसाकच्छा विद्यार्थी परिषद पाडली पार बौद्ध धर्माची आंतरविद्याशाखीय भूमिका ही यंदाची मध्यवर्ती संकल्पना

धम्मसाकच्छा विद्यार्थी परिषद पाडली पार बौद्ध धर्माची आंतरविद्याशाखीय भूमिका ही यंदाची मध्यवर्ती संकल्पना

sakal_logo
By

पुणे, ता. १० : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागातर्फे धम्मसाकच्छा आंतरराष्ट्रीय विद्यार्थी परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे यंदाचे दहावे वर्ष होते. बौद्ध धर्माची आंतरविद्याशाखीय भूमिका ही या वर्षीच्या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना होती. परिषदेचे उद्‍घाटन मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे (टीआयएफआर) संचालक प्रा. जयराम चेंगलूर यांनी केले.

प्रा. चेंगलूर यांनी आपल्या उद्‍घाटनपर भाषणात सिगालोवादसुत्त, महापरिनिब्बानसुत्त आदींची उदाहरणे देत बौद्ध धर्माची आजच्या काळातील प्रासंगिकता विशद केली. ‘टीआयएफआर’चे सहयोगी प्राध्यापक डॉ. एस. आर. बोधि यांनी बीजभाषण केले. त्यांनी बौद्ध धर्माच्या सामाजिक संदर्भांचा परामर्श घेतला, तसेच बौद्ध ग्रंथांचा अभ्यास करताना आपण त्यांचा संदर्भ लक्षात घेऊन अभ्यास केला पाहिजे असेदेखील सांगितले. विद्यार्थ्यांना विद्यार्थिदशेतच संशोधनाचे बाळकडू मिळावे या उद्देशाने विभागातर्फे २०१४ पासून ही परिषद आयोजित करण्यात येते.

विद्यापीठाच्या पाली आणि बौद्ध अध्ययन विभागाव्यतिरिक्त देशातील अन्य आठ विद्यापीठे तसेच, चीन व बांगलादेशातील विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेतला होता. एम.फिल.-पीएच.डी. विभागात १७, एम.ए विभागात २९ आणि प्रमाणपत्र-पदविका विभागात ९ असे एकूण ५५ शोधनिबंध परिषदेत सादर केले गेले. प्रमाणपत्र-पदविका विभागात पुणे विद्यापीठाच्या पाली आणि बौद्ध अध्ययन विभागातील डॉ. दीप्ती किरतकर यांनी प्रथम क्रमांकाचे तर सोमय्या विद्याविहार विद्यापीठातील सुरभी अग्रवाल हिने द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पटकावले. विभागप्रमुख प्रा. महेश देवकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले, संयोजिका प्रा. प्रणाली वायंगणकर यांनी प्रास्ताविक केले तर विभागातील विद्यार्थी रविरंजन याने सूत्रसंचालन केले. प्रा. दीपाली पाटील यांनी आभार मानले, तर शाक्य विभोर मौर्य याने समारोप केला.

यांच्या शोधनिबंधांना पारितोषिके
१) प्रथम क्रमांक : प्रकृती मुखर्जी, मकाऊ विद्यापीठ (चीन)
२) द्वितीय क्रमांक : ग्युयेन द्युच्यौंग (भिक्खू मिन्ह न्हन), गौतम बुद्ध विद्यापीठ (व्हिएतनाम)
३) तृतीय क्रमांक : ग्युयेन थि किम आन (भिक्खुणी पञ्ञालोका) आणि युवराज सुरवडे