पुणे बुक फेअरला सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे बुक फेअरला सुरुवात
पुणे बुक फेअरला सुरुवात

पुणे बुक फेअरला सुरुवात

sakal_logo
By

पुणे, ता. १० ः साहित्यिक व ललित पुस्तकांसह शैक्षणिक पुस्तकांचाही समावेश असलेल्या ‘पुणे बुक फेअर’ अर्थात ‘पुणे पुस्तक जत्रा’ या मालिकेतील २० व्या प्रदर्शनाचे उद्‍घाटन माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या हस्ते झाले. क्रिएटी सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. महेश, हिंदू ग्रुपचे एन. वैद्यनाथन, पुणे बुक फेअरचे संयोजक पी. एन. आर. राजन, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे दीपक करंदीकर यावेळी उपस्थित होते.
पुणे बुक फेअरमध्ये शैक्षणिक पुस्तके, विविध भारतीय व परदेशी भाषांतील पुस्तके, सरकारी प्रकाशने, साहित्य अकादमी, नॅशनल लायब्ररी, कोलकता, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचा भारतीय चित्रपटांचा गौरवशाली इतिहास दाखवणारा स्टॉल आदींचा समावेश आहे. याअंतर्गत शनिवारी (ता. ११) सकाळी ११ वाजता ‘ऑथर्स मीट’मध्ये डॉ. हेमाली जोशी आणि डॉ. नित्या प्रकाश यांच्याशी संवाद आणि रविवारी (ता. १२) सायंकाळी सहा वाजता मराठी कविसंमेलन होणार आहे. हे प्रदर्शन रविवारपर्यंत (ता. १२) क्रिएटी सिटी मॉल येथे सकाळी ११ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. अधिकाधिक लोकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन संयोजक पी. एन. आर. राजन यांनी केले आहे.