आनंद स्मृती संगीत मैफिलीचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आनंद स्मृती संगीत मैफिलीचे आयोजन
आनंद स्मृती संगीत मैफिलीचे आयोजन

आनंद स्मृती संगीत मैफिलीचे आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. १० ः गुणीदास संगीत विद्यालयातर्फे आयोजित पं. आनंदबुवा लिमये स्मृती संगीत मैफल नुकतीच पार पडली. यावेळी डॉ. अश्विनी चांदेकर, विश्वास शिरगावकर आणि पं. अरुण द्रविड यांचे बहारदार गायन झाले. डॉ. चांदेकर यांनी राग नंद आणि काफी कानडा सादर केला. शिरगावकर यांनी भूपनट, आडंबरी केदार सादर केले. पं. अरुण द्रविड यांनी सावनी नट, बागेश्री बहार, खोकर हे राग सादर केले. या कलाकारांना संवादिनीवर अमेय बिच्चू, तबल्यावर ईशान परांजपे व आशय कुलकर्णी आणि तानपुरा व स्वरसाथ डॉ. नेहा गोडबोले, पल्लवी बापट, जुई धायगुडे, अनुराधा कुबेर, साक्षी वाशीवाले, अनन्या गुर्जर यांनी केली. डॉ. राजश्री महाजनी यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ गायक डॉ. विकास कशाळकर यांच्यासह निर्मला गोगटे, मधुवंती दांडेकर, मिलिंद मालशे, पं. प्रमोद मराठे, डॉ. केशव साठ्ये, डॉ. लता गोडसे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुणे पीपल्स बँकेतर्फे महिला दिन साजरा
पुणे, ता. १० ः पुणे पीपल्स बँकेतर्फे जागतिक महिला दिन नुकताच अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. बँकेचे अध्यक्ष ॲड. सुभाष मोहिते यांच्या संकल्पनेतून बँकेच्या पुणे शहर व परिसरातील तसेच ठाणे व बेळगाव येथील २० शाखांमध्ये एकाच वेळी म्हणजे दुपारी ४ ते ६ या वेळेत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. या महिलांना ‘कडिपत्त्याचे रोप’ देऊन सन्मानित करण्यात आले. बॅंकेच्या विविध शाखांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सुमारे एक हजार महिलांचा सत्कार संचालक मंडळाच्या सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. बँकेच्या उपाध्यक्षा वैशाली छाजेड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.