Fri, March 31, 2023

छत्रपती संभाजी महाराज यांच्या भित्तीचित्राचे उद्घाटन
छत्रपती संभाजी महाराज यांच्या भित्तीचित्राचे उद्घाटन
Published on : 11 March 2023, 6:19 am
पुणे, ता. ११ ः नारायण पेठ येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३४ व्या बलिदानदिनानिमित्त भित्तीचित्र साकारून त्यांना अभिवादन करण्यात आले. दिवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते या भित्तिचित्राचे उद्घाटन करण्यात आले. माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या संकल्पनेतून नीलेश आर्टस् यांनी ५० बाय ३० फुटाचे हे भित्तीचित्र साकारले. त्यासाठी सुमारे १५० लिटर रंगाचा वापर केला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे, काँग्रेसचे मोहन जोशी, बाळासाहेब दाभेकर, करण मानकर, हर्षवर्धन मानकर आदी उपस्थित होते. गीतगंगा अपार्टमेंट, जनता सहकारी बॅंक, सणस क्रेन, भोलेनाथ मित्र मंडळ, ५२ बोळ मित्र मंडळ, भरत मित्र मंडळ यांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले.