Sat, March 25, 2023

एनडीएच्या कॅडेट्सचा अभ्यास दौरा
एनडीएच्या कॅडेट्सचा अभ्यास दौरा
Published on : 12 March 2023, 11:09 am
पुणे, ता. १२ ः राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीला (एनडीए) ७५ वर्षे झाल्यानिमित्त प्रबेधिनीद्वारे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नुकतेच एनडीएतील कॅडेट्सनी छत्रपती संभाजीनगर येथे भेट दिली. शारीरिक, शैक्षणिक अभ्यासक्रमांबरोबर एनडीएतील कॅडेट्ससाठी अशा प्रकारच्या दौऱ्यांचे आयोजन करत विविध गोष्टींचे अनुभव दिले जाते. दरम्यान, अग्निबाज विभागाच्या वतीने कॅडेट्ससाठी या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कॅडेट्सला लष्कराच्या तोफखाना विभागाच्या कार्यप्रणालीची माहिती देण्यात आली.