Tue, March 21, 2023

यशवंतराव चव्हाण जयंती
यशवंतराव चव्हाण जयंती
Published on : 13 March 2023, 9:56 am
पुणे, ता. १३ ः आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची ११० वी जयंती महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयाच्या प्रांगणात सोमवारी साजरी करण्यात आली. या प्रसंगी चव्हाण यांच्या चौफेर कार्याचा आढावा घेण्यात आला. मुद्रणालयाचे संचालक अंकुश काकडे यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ पत्रकार जयराम देसाई, मुद्रणालयाचे व्यवस्थापक चंद्रशेखर सातपुते, प्रकाश भोईटे, गणपत मोरे, संध्या बिडवे उपस्थित होते.