Tue, March 28, 2023

ज्येष्ठ महिलेचा सोन्याचा हार चोरीस
ज्येष्ठ महिलेचा सोन्याचा हार चोरीस
Published on : 13 March 2023, 12:33 pm
पुणे, ता. १३ : ज्येष्ठ महिलेच्या चेहऱ्यावर रंग टाकून गळ्यातील ८० हजार रुपयांचा सोन्याचा हार दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावून नेल्याची घटना रविवारी (ता. १३) धनकवडी भागात घडली. याबाबत एका ७२ वर्षीय ज्येष्ठ महिलेने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ महिला धनकवडीतील चैतन्यनगर भागातील मैदानाजवळून निघाली होती. त्या वेळी दुचाकीस्वार चोरटा महिलेजवळ थांबला आणि त्याने महिलेच्या चेहऱ्यावर रंग टाकला. काही कळायच्या आत चोरटा महिलेच्या गळ्यातील ८० हजार रुपयांचा सुवर्णहार हिसकावून पसार झाला. पसार झालेल्या चोरट्याने ओळख लपविण्यासाठी चेहऱ्याला रंग लावला होता.