विद्यापीठात लवकरच ड्रोनविषयक अभ्यासक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठात लवकरच
ड्रोनविषयक अभ्यासक्रम
विद्यापीठात लवकरच ड्रोनविषयक अभ्यासक्रम

विद्यापीठात लवकरच ड्रोनविषयक अभ्यासक्रम

sakal_logo
By

पुणे, ता. १५ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘ड्रोन’विषयक अभ्यासक्रमांना सुरुवात केली जाणार आहे. यामध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम, पदवी, पदविका अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे. विद्यापीठाने नुकताच ड्रोन तंत्रज्ञान विषयातील ड्रोनआचार्य या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे.

या वेळी कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे, व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, प्रसेनजित फडणवीस, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य डॉ. सतीश देशपांडे, विद्यापीठ सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर, इनोव्हेशन सेलचे प्रमुख डॉ. संजय ढोले, कॅप्टन चंद्रशेखर चितळे, ‘ड्रोनआचार्य’चे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक प्रतीक श्रीवास्तव आदी उपस्थित होते.

ड्रोनचा वाढता उपयोग लक्षात घेता भविष्यात या विषयात अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात असे सांगत डॉ. अभ्यंकर म्हणाले, ड्रोन तंत्रज्ञानातील केवळ ड्रोन पायलट प्रशिक्षणच नाही तर ड्रोन बिल्डिंग, ड्रोन रेपेअरिंग अँड मेंटेनन्स, ड्रोन डेटा प्रोसेसिंग, ड्रोन्स फॉर डिझास्टर मॅनेजमेंट, कृषी नियोजन करण्यासाठी ड्रोनचा वापर आणि कोडिंग आदी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जातील. विद्यार्थ्यांच्या प्रतिसादानुसार हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रमांवर भर देण्यात आला आहे, असेही डॉ. अभ्यंकर यांनी सांगितले. या विषयाची अधिक माहिती काही दिवसांत तंत्रज्ञान विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल, असेही डॉ. अभ्यंकर यांनी सांगितले.