अमली पदार्थांची तस्करी करणारे दोघे अटकेत

अमली पदार्थांची तस्करी करणारे दोघे अटकेत

पुणे, ता. १९ : अमली पदार्थ विरोधी पथकाने वानवडी परिसरात कारवाईकरून तब्बल ११ लाखांचा अमली पदार्थ पकडला आहे. या कारवाईत पोलिसांनी एमडी, एलसीडी, मशरूम तसेच चरस असा वेगवेगळा अमली पदार्थ पकडला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. लायनल लेझली मेस्करेंस (वय ३३) व रसल अन्थोनी चंदनशीव (वय २१, रा. वानवडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सुनील थोपटे यांना दोघे संशयित अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी एका बँकेजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पथकाने याठिकाणी सापळा रचला. तसेच, दोघे संशयित दिसताच त्यांना पकडले. त्यांची झडती घेतली असता लायनल याच्याकडे एमडी, एलसीडी, मशरूम, चरस, हाशिस ऑइल तसेच रसल याच्याकडे एलसीडी पेपर, ओजीकोश गांजा आणि इतर ऐवज मिळाला. त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल ११ लाख ९३ हजारांचा ऐवज जप्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com