शहरातील काही भागात गुरुवारी पाणी बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरातील काही भागात गुरुवारी पाणी बंद
शहरातील काही भागात गुरुवारी पाणी बंद

शहरातील काही भागात गुरुवारी पाणी बंद

sakal_logo
By

पुणे, ता. २० : चिखली जलशुद्धीकरण केंद्र व चतुश्रृंगी जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा गुरूवारी (ता. २३) बंद राहणार आहे. शुक्रवारी (ता. २४) या भागाला कमी दाबाने आणि उशिराने पाणी पुरवठा होणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे.

चिखली जलशुद्धीकरण केंद्रामध्ये फ्लो मीटर बसविणे, पर्वती ते एस.एन.डी.टी. दरम्यान अस्तित्वात असलेल्या १२०० मि.मी. व्यासाच्या पाण्याच्या वाहिनीतील गळती बंद करणे, तसेच चतुश्रृंगी येथील आशा नगर भागातील पाण्याच्या टाकीला पुरविण्यात येणाऱ्या पाण्याची वाहिनी मुख्य जलवाहिनीला जोडणे अशी विविध कामे महापालिकेकडून हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे या केंद्रातून होणारा पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे.

चतुश्रृंगी टाकीवरून पाणीपुरवठा बंद होणारा भाग
चतुश्रुंगी टाकी परिसर, औंध, बोपोडी, औंध रोड, खडकीचा काही भाग (पुणे मुंबई महामार्ग), अभिमानश्री सोसायटी, विधाते वस्ती, आय.टी.आय. रोड, पंचवटी, कस्तुरबा वसाहत, सिद्धार्थ नगर, औंध गाव, पुणे विद्यापीठ परिसर, भाऊ पाटील रोड, बाणेर रोड परिसर, भोईटे वस्ती, सिंध सोसायटी, सानेवाडी, आनंद पार्क, नागरस रोड, आय. सी. एस. कॉलनी भोसले नगर, इंदिरा वसाहत, सकाळ नगर, अनगळ पार्क, राजभवन.

चिखली जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणीपुरवठा बंद होणारा भाग
गणेश नगर बोपखेल, म्हस्के वस्ती आळंदी रोड, टिंगरेनगर, आदर्श कॉलनी, बर्माशेल झोपडपट्टी, पुणे एअरपोर्ट लोहगाव, राजीव गांधी नगर (नॉर्थ आणि साऊथ), विमाननगर, यमुनानगर, श्रीपार्क सोसायटी, पाराशर सोसायटी, दिनकर पठारे वस्ती, ठुबे पठारे नगर, खराडी बायपास रोड.