शहर विकासासाठी...

शहर विकासासाठी...

शहर विकासासाठी...
पाणी पुरवठा
- समान पाणीपुरवठा योजने अंतर्गत अल्ट्रासॉनिक किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक मीटर बसविणे
- मीटर ना दुरुस्ती प्रमाण कमी करणे
- लोकअदालत भरवून थकबाकी वसूल करणे
- समाना पाणीपुरवठ्यांतर्गत ७० साठवण टाक्या कार्यान्वित करणे
- ३५० किलोमीटर लांबीची नवीन जलवितरण व्यवस्था विकसित करणे

मलनिःसारण
- नऊ मैलापाणी शुद्धीकरण केंद्र अद्ययावत करण्यासाठी सल्लागार नेमणे
- समाविष्ट ३४ गावांमध्ये मलवाहिन्या विकसित करण्यासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद
- जुन्या मलवाहिन्या बदलण्यासाठी १७७ कोटी रुपयांची तरतूद
- नालेसफाई, पावसाळी लाइन याच्या साफसफाई आणि दुरुस्तीसाठी ७५ कोटी रुपयांची तरतूद

घनकचरा व्यवस्थापन
- आधुनिक हस्तांतर केंद्र उभारणार
- राडारोडावर प्रक्रिया करण्यासाठी २५० टन प्रतिदिन क्षमतेचा प्रकल्प
- कचऱ्यापासून हायड्रोजन निर्मिती प्रकल्पाची तरतूद

आरोग्य
- वारजेमध्ये मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याची प्रक्रिया
- वानवडी येथे केपीसीटी मॉलमध्ये शंभर खाटांचे रुग्णालय उभारणार
- भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी महाविद्यालायाशी संलग्न रुग्णालयासाठी ६२ कोटी रुपयांची तरतूद

वाहतूक नियोजन
- विश्रांतवाडी येथे उड्डाणपूल उभारणे
- शहरातील जुन्या पुलांच्या दुरुस्तीसाठी २३ कोटी रुपयांची तरतूद
- सांगवी-बोपोडीला जोडणाऱ्या पुलाच्या उभारणीसाठी १५ कोटी रुपयांची तरतूद
- सनसिटी-कर्वेनगर यांना जोडणाऱ्या पुलासाठी ४० कोटी रुपयांची तरतूद

पथ
- शहरातील विविध ठिकाणी ९५ किलोमीटर लांबीचा सायकल ट्रॅक उभारणे
- मध्यवस्तीतील प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरणासाठी तरतूद
- पुणे सिटी प्रॉग्रॅमअंतर्गत पाच रस्त्यांची पुनर्रचना करणार
- बालभारती ते पौड रस्त्याचे काम हाती घेणार
- ‘पीपीपी’ आणि डेव्हलपमेंट क्रेडिट नोटच्या माध्यमातून १३ रस्ते विकसित करणार

उद्यान
- राजीव गांधी प्राणी संग्रहालय नव्याने पुनर्विकसित करणार
- पु. ल. देशपांडे उद्यान येथील तिसऱ्या टप्प्यातील कलाग्रामचे काम पूर्ण करणार
- खराडी येथील आरक्षित जागेवार उद्यान विकसित करणार

भवन रचना
- डॉ. नायडू रुग्णालय परिसरात वैद्यकीय महाविद्यालयाचे वसतीगृह उभारणार
- लोहियानगर येथील अग्निशमनची इमारत नव्याने बांधणार
- महापालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहती पाडून नव्याने बांधणार
- बाणेर येथे प्रसूतिगृह उभारणार

शैक्षणीक
- समाविष्ट गावातील शाळकरी विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्य पुरविणे
- डीबीटी योजनेतून ९२,७३० विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्य मिळणार
- महापालिकेच्या १५० शाळांवर सोलर पॅनेल बसविणार
-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com