व्यंगचित्र स्पर्धा

व्यंगचित्र स्पर्धा

फोटो ओळीत ठिकाण टाकणे, पांडुरंग सरोदे यांना विचारले आहे.
---
खुपणाऱ्या, बोचणाऱ्या गोष्टींसाठी
व्यंगचित्रे महत्त्वाचे माध्यम
सुषमा अंधारे यांचे प्रतिपादन
पुणे, ता. ५ ः समाजप्रबोधनाचे सर्वांत महत्त्वाचे माध्यम म्हणून व्यंगचित्रांकडे पाहिले जाते. एकाच व्यंगचित्रात खूप मोठा आशय लपलेला असतो. व्यंगचित्रांच्या माध्यमातून खुपणाऱ्या, बोचणाऱ्या गोष्टी हसतखेळत आणि मार्मिक पद्धतीने समाजापर्यंत सहज पोहोचविणे शक्‍य होते,'''' असे प्रतिपादन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले.
जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त आयोजित "बाळकडू'' व्यंगचित्र स्पर्धेचे बक्षिस वितरण त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या म्हणाल्या, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाजातील अनेक प्रश्नांना वाचा फोडली. व्यंगचित्रांतून ठाम पद्धतीने मांडणी करण्यासाठी एकप्रकारचे धाडसच लागते. ते बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे होते. भावना परिणामकारक पद्धतीने व्यक्त करण्यासाठी व्यंगचित्र हे सर्वांत प्रभावी माध्यम आहे.''''
यावेळी पक्षाचे सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी गटनेते अशोक हरणावळ, उपशहरप्रमुख बाळा ओसवाल, प्रशांत राणे, सचिव मकरंद पेटकर, व्यंगचित्रकार मुकीम तांबोळी आदी उपस्थित होते. संजय मोरे म्हणाले, ही स्पर्धा म्हणजे सामान्य माणसाला लढण्यासाठी, आवाज व्यक्त करण्यासाठी मिळालेला भाला आहे. चुकीचे काम करणाऱ्याला जागे करण्याचे हे एक माध्यम आहे.
---
यश गायकवाड, विजय नांगरे प्रथम
या स्पर्धेत युवा गटामध्ये यश गायकवाड याने प्रथम क्रमांक पटकाविला. निमिष सामंतने द्वितीय, तर मनोमय नार्वेकरने तृतीय क्रमांक प्राप्त केला. आभास शिळीमकर, शेराता क्षत्रिय, जीजा पापळ यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. खुल्या गटात विजय नांगरे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. सुनील नेटके यांनी द्वितीय, तर श्रीपाद पालकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. वासुदेव बोंदरे, तौफिक बागवान, मुकीम तांबोळी, गौतम धिवार, शरद महाजन यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले.
---
फोटो
47723
ओळी

व्यंगचित्र स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांच्या प्रवेशिका पाहताना सुषमा अंधारे.
--------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com