जागा हवी असल्यास आधी पुनर्वसन करा

जागा हवी असल्यास आधी पुनर्वसन करा

पुणे, ता. ६ ः घोरपडी गाव येथील पंचशील नगरातील सुमारे पाचशे कुटुंबांना रेल्वे प्रशासनाने जागा खाली करण्याची नोटीस दिली आहे. मात्र, मुळात ही जागा चर्चच्या मालकीची असून रेल्वेने त्या जागेवर ताबा सांगितला आहे. रेल्वेला आम्ही राहत असलेली जागा हवी असेल तर आधी आमचे पुनर्वसन करा, आणि मगच कारवाई करा अशी मागणी घोरपडीगाव पंचशील नगर झोपडपट्टी बहुजन संघाच्या वतीने राज राजपूत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

पंचशील नगरातील रेल्वेच्या मालकीच्या जागेवरील झालेले अतिक्रमण काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सुमारे ५०० कुटुंबाला घरे खाली करण्याचे नोटीस दिली आहे. जर कारवाई झाली तर आम्ही रस्त्यांवर येऊ. या संदर्भात महापालिका व अन्य यंत्रणेशी संपर्क साधला असता कोणीच मदत करण्यासाठी पुढाकार घेत नाही. रेल्वे प्रशासनाने येत्या दहा ते बारा दिवसांत घरे खाली करण्याची नोटीस दिली आहे. यासाठी ते सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचा दाखला देत असल्याचे राजपूत यांनी सांगितले. मात्र, मूळात ही जागा चर्चच्या मालकीची असून आम्ही ते कागदपत्रे घेऊन न्यायालयीन लढाई लढणार असल्याची भूमिका राजपूत यांनी मांडली. या वेळी बाळासाहेब जावळे, रेहाना खान यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com