जिल्ह्यातील २३ तलाव गाळमुक्तीचे काम सुरू

जिल्ह्यातील २३ तलाव गाळमुक्तीचे काम सुरू

पुणे, ता. ६ : जलसंपदा विभागाने एक हजारांहून अधिक तलावांची पाहणी करून त्यांची यादी जिल्हा प्रशासनाकडे पाठविली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने १३ तालुक्यांतील ६० ठिकाणी ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ उपक्रमांतर्गत कामांना सुरवात केली आहे. पहिल्या टप्प्यात २३ तलाव गाळमुक्त करण्याचे काम हाती घेतले आहे.
धरण, तलाव, सरोवरांची साठवण क्षमता वाढावी, पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ नये, तसेच जमिनीतील सुपिकतेत वाढ व्हावी, हा उद्देश ठेवून राज्य सरकारने ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ ही योजना जाहीर केली आहे. त्यासाठी राज्य सरकार निधी देणार आहे. याबाबत जलसंपदा विभागाने पाहणी करून पुणे जिल्ह्यातील १०१६ पाझर तलावांची यादी तयार केली आहे. पहिल्या टप्प्यात २३ आणि दुसऱ्या टप्प्यात ३७ अशा ६० प्रस्तावांना मंजुरी देत कामांना सुरवात केली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, ‘जिल्ह्यातील ६० धरणे, सरोवर, तलावांमधील गाळ काढण्यात येत आहे. या ठिकाणी दीड हजार क्युबिक मीटर गाळ आहे. याबाबतचे सादरीकरण जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केले होते. महात्मा फुले विकास मंच, नाम, प्रेरणा फाउंडेशन, रेन ट्री फाउंडेशन आदी संस्था या कामात प्रशासनाला मदत करत आहेत. या तलावांमधून काढलेल्या गाळाचे स्थानिक शेतकऱ्यांना वाटप करणार आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com