गोळीबारप्रकरणी एकाला अटक

गोळीबारप्रकरणी एकाला अटक

पुणे, ता. ६ : वानवडी परिसरात सराईत गुन्हेगार पच्चीस ऊर्फ फैजान रमजान शेख (वय २१, रा. सय्यदनगर, कोंढवा) याच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चेतन बाळू जाधव (वय २१, रा. ससाणेनगर, हडपसर) आणि यश सुनील ससाणे (वय २२, रा. महंमदवाडी, हडपसर) अशी आरोपींची नावे आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार यश ससाणे याने एका तरुणावर गोळीबार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तपासादरम्यान पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांना आरोपी कॅम्पमधील जुना मोदीखाना परिसरात आल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com