केंद्र सरकारच्या योजनांचा लोकसभेच्या तोंडावर प्रचार

केंद्र सरकारच्या योजनांचा 
लोकसभेच्या तोंडावर प्रचार
Published on

पुणे, ता. २८ ः आगामी लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना केंद्र सरकारकडून त्यांनी गेल्या पाच वर्षांत राबविलेल्या योजनांच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे. २८ नोव्हेंबर ते २६ जानेवारी या कालावधीत यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ काढली जाणार आहे. केंद्र सरकारने यासाठी मोबाईल थिएटर व्हॅन उपलब्ध करून दिली असून, दोन महिन्यांत ही व्हॅन १२५ ठिकाणी योजनांचा प्रचार व प्रसार करणार आहे.
केंद्र सरकारतर्फे ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ अभियान राबविण्यात येत आहे. या यात्रेअंतर्गत केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचविणे, त्याची जनजागृती, प्रसार, नवीन लाभार्थी नोंदणी तसेच लाभार्थ्यांशी संवाद साधला जाणार आहे. यातून पीएम स्वनिधी शिबिर, आयुष्मान योजना शिबिर, आरोग्य शिबिर, आधार अद्ययावतीकरण शिबिर, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस शिबिराचे आयोजन केले जाणार आहे.

असा आहे उद्देश
या यात्रेच्या माध्यमातून ज्या नागरिकांपर्यंत योजना पोचल्या नाहीत त्यांना योजनेचा लाभ देणे, माहितीचा प्रसार व प्रचार करणे, योजनांबाबत जनजागृती करणे, नागरिकांशी संवाद साधणे, नवीन लाभार्थी नोंदणी करणे, हा या यात्रेचा उद्देश आहे, अशी माहिती समाजविकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com