

पुणे, ता. २८ : निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यात दिव्यांग व्यक्तींच्या मतदार नाव नोंदणीसाठी दिव्यांगांच्या विशेष शाळांमध्ये ९ डिसेंबरपर्यंत शिबिरे होणार आहेत. शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांकडून मतदार नोंदणीचे, मतदार यादीतील नोंदीच्या दुरुस्ती किंवा नाव वगळणीचे अर्ज मागविण्यात येत आहेत. याशिवाय दिव्यांग व्यक्तींची मतदार यादीतील नोंद चिन्हांकित करणे व निवडणूक आयोग मतदानाच्या दिवशी दिव्यांगांना पुरवत असलेल्या सुविधांबाबत माहिती देण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग बांधवांना मतदार नोंदणीसाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळावर किंवा Voter Search Helpline या मोबाईल ॲपद्वारेदेखील अर्ज भरता येतील. या सुविधेचा जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.