

पुणे, ता. २८ : मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक प्रश्नावर चर्चा करण्यासाठी हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वतीने शुक्रवारी (ता. १) व शनिवारी (ता. २) राज्यस्तरीय मुस्लिम शिक्षण परिषद होणार आहे. यात राष्ट्रीय पातळीवरील शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
संस्थेच्या अध्यक्षा इला दलवाई यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ते शरद जावडेकर, अन्वर राजन उपस्थित होते. हमीद दलवाई यांनी १९७३ मध्ये कोल्हापूर येथे मुस्लिम शिक्षण परिषद घेतली होती. त्याला ५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आयोजित केलेली ही परिषद नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात होणार आहे. परिषदेचे उद्घाटन सच्चर समिती सेक्रेटरी सदस्य अबुसालेह शरीफ यांच्या हस्ते होईल. या वेळी माजी खासदार व कॉंग्रेस नेते हुसेन दलवाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मुस्लिम शिक्षणाची सद्यःस्थिती, समाजाच्या शिक्षणापुढील आव्हाने, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व मुस्लिम समाजाचे मागासलेपण, अल्पसंख्याक संस्थांचे कायदेशीर अधिकारी, मुस्लिमांच्या शैक्षणिक उन्नतीसाठीच्या योजना अशा विविध विषयांवर चर्चा होणार आहे. त्यात ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ शमसूल इस्लाम, मुस्लिम शिक्षणाचे अभ्यासक जॉन कुरियन, ज्येष्ठ अभ्यासक प्रा. अब्दुल शाबान, प्रा. राणू जैन, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण निकम आदींचा सहभाग असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.