पुणे विद्यापीठ

पुणे विद्यापीठ
Published on

विद्या परिषदेवर सात सदस्यांची निवड

पुणे, ता. २८ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलपती आणि राज्यपाल रमेश बैस यांनी विद्यापीठाच्या विद्या परिषदेवर सात सदस्यांचे नामनिर्देशन केले आहे. त्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश असून, या सात सदस्यांची नावे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे यांनी परिपत्रकाद्वारे जाहीर केली आहेत.
कुलपती यांनी नामनिर्देशन केलेल्या सात सदस्यांमध्ये पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेचे (आयसर पुणे) संचालक प्रा. सुनील भागवत, रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट इंजिनिअर्सचे संचालक डॉ. मकरंद जोशी, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष दीपक करंदीकर, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप उके, डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट ॲण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे कुलगुरू डॉ. प्रमोद पांडे, भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे प्रभारी संचालक संदीप शहारे, एनसीसी पुणेचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर अर्जुन मित्रा यांचा समावेश आहे.
विद्यापीठाच्या विद्या परिषदेवर सदस्य म्हणून नामनिर्देशन केलेल्या सात जणांच्या सदस्यत्वाची मुदत ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत किंवा महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ६३ व ६४ मधील तरतूद अथवा महाराष्ट्र सरकारकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या आदेशांच्या अधीन राहून यापैकी जे अगोदर घडेल, त्या तारखेपर्यंत संपुष्टात येईल, असे डॉ. खरे यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com