बांधकामे

बांधकामे
Published on

बाणेर दुर्घटना; पुणे महापालिकेकडून समिती गठित, तीन दिवसांत अहवाल

इमारतीच्या बांधकामाची सखोल तपासणी

पुणे, ता. २८ ः बाणेर येथे शाळकरी मुलाच्या मृत्यूप्रकरणी आता ओम हाउसिंग या बांधकाम प्रकल्पाच्या बांधकामाची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी अधीक्षक अभियंता युवराज देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असून, तीन दिवसांत ही समिती अहवाल सादर करणार आहे. यामध्ये नियमांचे उल्लंघन झाले आहे का? फ्रंट मार्जिन कमी सोडले आहे का? यासह बांधकाम नियमावलीतील तरतुदींचे उल्लंघन केले आहे का?, याची तपासणी केली जाणार आहे. पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ही माहिती दिली.
बाणेर येथे बुधवारी (ता. २२) दुपारी शाळा सुटल्यानंतर आईबरोबर घरी चालत जाणाऱ्या रुद्र राऊत या हा नऊ वर्षांचा मुलाच्या डोक्यात लोखंडी गट्टू पडल्याने त्याचा मृत्यू झाला. रुद्र आणि त्याची आई पादचारी मार्गावरून चालत होते, तरीही या अपघातात त्याचा हकनाक बळी गेला. त्यामुळे बांधकामाच्या ठिकाणच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

तक्रारी आल्या आहेत
बाणेर येथे ओम हाउसिंग या बांधकाम व्यावसायिकाचे अजित कर्नावट यांच्यातर्फे सुमारे १५ मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. ही घटना घडल्यानंतर पुणे महापालिकेने पुढील आदेशापर्यंत काम थांबविण्याचे आदेश दिला आहे. दरम्यान, ही इमारत रस्त्यापासून खूप जवळ आहे. फ्रंट मार्जिन कमी सोडलेले नाही, अशा तक्रारी बांधकाम विभागाकडे आलेल्या आहेत.

समिती काय करणार?
- अधीक्षक अभियंता युवराज देशमुख यांची समिती गठित
- यामध्ये वास्तुविशारद, क्रेडाईच्या सदस्यांचा समावेश
- ही समिती बांधकाम नकाशा, प्रत्यक्ष केलेले बांधकाम, इमारतीच्या उंचीनुसार फ्रंट आणि साइड मार्जिन सोडले आहे की नाही याची तपासणी करणार
- तीन दिवसांत अहवाल देणार
- नियमाचे उल्लंघन झालेले असल्यास संबंधित बांधकाम व्यावसायिकासह पुणे महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांच्यावरही कारवाई केली जाणार

बाणेर दुर्घटनेच्या प्रकरणी संबंधित बांधकामाची तपासणी करून तीन दिवसांत अहवाल सादर केला जाणार आहे. तसेच ही दुर्घटना का घडली, सुरक्षेसाठीची जाळी व्यवस्थित का लावली नव्हती, याचीही चौकशी केली जाणार आहे. पण याचा अहवाल नंतर प्राप्त होईल.
- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका

बांधकाम विभागाशी चर्चा करू
पुणे शहरातील बांधकामाच्या ठिकाणी काळजी घेतली जात आहे की नाही, या प्रत्येक ठिकाणी मनुष्यबळाच्या अभावी महापालिकेचे अभियंते तपासणी करू शकत नाहीत, ती जबाबदारी संबंधित बांधकाम व्यावसायिकाची आहे, असे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितले होते. त्याबाबत आयुक्त विक्रम कुमार यांना विचारले असता, ‘‘बांधकाम विभागाकडून तपासणी झाली पाहिजे, पण बांधकाम विभागाचे नेमके काय म्हणणे आहे यावर त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ’’ असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com