

उपाध्यक्षपदी सुभाषराव ढमाले
पुणे, ता. २८ : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या उपाध्यक्षपदी सुभाषराव ढमाले यांची नुकतीच निवड झाली. संघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांच्या हस्ते ढमाले यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी संतोष नानवटे, दशरथ पिसाळ, रणजित जगताप, अजय पाटील, करण रणवीर उपस्थित होते.
बौद्ध महासभातर्फे संविधान दिन
पुणे, ता. २८ : भारतीय बौद्ध महासभातर्फे संविधान दिन साजरा करण्यात आला. प्रस्तावना रामदास सोनवणे यांनी केली. संविधान उद्देशिकेचे वाचन देवेंद्र कांबळे यांनी केले. निवृत्त अतिरिक्त आयुक्त सुखदेव पाटील यांनी ‘संविधान उद्देशिका’ याविषयावर मार्गदर्शन केले. एकनाथ जाधव आणि शंकर यादव यांनी धम्मगीत गायिले. सुरेखा चव्हाण यांनी २५ पुस्तके ग्रंथालयास भेट दिली. यावेळी के. बी. मोटघरे, नीलेश गायकवाड, डॉ. सुरेश कठाणे, एन. शिंदे, नामदेव इंगळे, ज्योती सोनवणे, मोहन सोनवणे उपस्थित होते. संदीप सोनावणे यांनी सूत्रसंचालन केले. तर यशवंत धनविजय यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.