ससूनमधील शिपायासह तिघांना अटक

ससूनमधील शिपायासह तिघांना अटक
Published on

पुणे, ता. २८ ः अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याला पळून जाण्यास मदत करणाऱ्या तिघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. यात ससून रुग्णालयातील शिपाई, येरवडा कारागृहातील पोलिस आणि सुमपदेशकाचा समावेश आहे.
महेंद्र यशवंत शेवते (वय ५७, रा. रक्षकनगर, खराडी), मोईस अहमद शेख (वय ३०, मूळ रा. देगलूर, जि. नांदेड) आणि सुधाकर सखाराम इंगळे (वय ४४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शेवते हा ससून रुग्णालयातील कर्मचारी आहे. तर शेख कारागृहातील पोलिस आणि इंगळे कारागृहात समुपदेशक म्हणून कार्यरत आहे. शेवते आणि शेख यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना न्यायालयाने एक डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर इंगळे यांना मंगळवारी उशिरा अटक करण्यात आली आहे. त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

शेखच्या मोबाईलचा वापर
शेवते हा ललित पाटीलसह भूषण पाटील, अभिषेक बलकवडे यांच्या संपर्कात होता. त्याने ललित पाटीलला पळून जाण्यास कशा प्रकारे मदत केली याचा तपास करायचा आहे. शेख हा येरवडा कारागृहाचा कर्मचारी ससूनमधील वॉर्ड क्रमांक १६ समोर गार्ड म्हणून कार्यरत होता. दोन ऑक्टोबरला ललितने शेख याचा मोबाईल वापरून ॲड. प्रज्ञा कांबळे आणि अभिषेक बलकवडे यांच्याशी संपर्क केला होता. त्यानंतर तो पसार झाला, अशा युक्तिवाद सरकारी वकील अॅड. नीलिमा इथापे-यादव यांनी केला.

...तेव्हा शेवते सुटीवर ः बचाव पक्ष
आरोपींच्या वतीने बाजू मांडताना ॲड. समीर घाटगे यांनी न्यायालयात सांगितले की, दोन ऑक्टोबरला गांधी जयंती असल्याने महेंद्र शेवते यांना सुट्टी होती. त्यामुळे शेवते ललित पाटीलला पळून जाण्यास कशी काय मदत करू शकतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून आरोपींना एक डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com