अवतीभवती

अवतीभवती
Published on

शनिवार-रविवार ‘मिती लघुपट महोत्सव’
पुणे, ता. २८ ः मिती लघुपट महोत्सव येत्या शनिवारी (ता. २) आणि रविवारी (ता. ३) स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात रंगणार आहे. अभिनेते अजय पूरकर या महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील, अशी माहिती मिती फिल्म सोसायटीचे अध्यक्ष मिलिंद लेले यांनी दिली. महोत्सवाचे हे तिसरे वर्ष असून शनिवारी दुपारी दोन वाजता ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‍घाटन होणार आहे. त्यानंतर लघुपटांचे स्क्रीनिंग आणि दुपारी ४.३० वाजता चर्चासत्र होईल. रविवारी सकाळी १० वाजता स्क्रीनिंगला सुरुवात होणार असून या दिवशी सकाळी ११.३० वाजता लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा ‘दिग्दर्शन’ या विषयावर ‘मास्टरक्लास’ होईल. सायंकाळी ५.३० वाजता पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे.

‘मौनातील मोती’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन
पुणे, ता. २८ ः वीणा कुलकर्णीलिखित ‘मौनातील मोती’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. राजेंद्र झुंजारराव यंच्या हस्ते नुकतेच झाले. याप्रसंगी संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अरविंद नेरकर, ज्येष्ठ पत्रकार अविनाश गोडबोले, सीमा पब्लिकेशन्सच्या सीमा शिंदे आदी उपस्थित होते. जयश्री कुलकर्णी, रागिणी कुलकर्णी, स्मिता शाळिग्राम, सुनीता कोगेकर, निलम कान्हेरे यांनी काव्यसंग्रहातील काही निवडक कवितांचे वाचन केले. अनंत जोशी यांनी सूत्रसंचालन केले. अंजली जोशी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com