
सर्व व्यवसायांत अद्ययावतपणा हवा
पुणे, ता. १ : ‘‘आपण जर जुन्या बाबींत गुंतून राहिलो तर जगाच्या तुलनेत मागे पडू शकतो. त्यामुळे नवीन गोष्टी स्वीकारा. सतत पुढे जाण्याचा विचार करीत त्यासाठी आवश्यक असलेले संशोधन करा. बदल हा व्यक्ती आणि संस्था दोन्हींना लागू आहे. येणारा काळ हा नवतंत्रज्ञानाचा आहे. त्यामुळे सर्व व्यवसायांत अद्ययावतपणा असायला हवा,’’ असे मत ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी व्यक्त केले.
‘सकाळ’च्या ९१ व्या वर्धापनदिनी पवार यांच्या हस्ते गेल्या वर्षभरात ‘सकाळ’मधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा आणि वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धेत विजेच्या ठरलेल्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी आजी-माजी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ‘सकाळ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, संपादक संचालक श्रीराम पवार, मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र पिसाळ, संपादक सम्राट फडणीस यावेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘कार्यालयीन कामाशिवाय आवडीच्या बाबींमध्ये देखील रस घेतला पाहिजे. आवड असेल तर सवड नक्की मिळते. त्यामुळे आवडीच्या बाबींना वेळ मिळत नाही अशी तक्रार करण्यापेक्षा कामाचे योग्य नियोजन करावे. त्यासाठी प्राधान्यक्रम ठरवावा. आपल्याला काय करायचे आहे याचा प्लॅन असेल तर आपण अनेक गोष्टी करू शकतो. नियोजन करून काम केल्यास संस्था आणि व्यक्तीची सर्वांगीण प्रगती होते.’’ निवृत्त झालेले निरंजन आगाशे यांचा यावेळी गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन छाया काविरे यांनी केले.
तर आंतरराष्ट्रीय संस्था कामाची खल घेतात
चांगले काम करीत राहिलो तर संस्थेची ख्याती सर्वदूर पसरते. बारामतीमधील ‘विद्या प्रतिष्ठान’ आणि ‘बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट’ हे त्याचे एक उदाहरण आहे. या दोन्ही संस्था करीत असलेल्या कामाची दखल घेत ‘ऑक्सफर्ड विद्यापीठ’, ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि ‘आयबीएम’ यांनी त्यांच्याबरोबर शिक्षण आणि शेती क्षेत्रात काम करण्याची इच्छा व्यक्ती केली. विशेष बाब म्हणजे या तीनही संस्थानी त्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतला. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थांच्या या उपक्रमांमुळे भारतातच नव्हे तर जगात बारामतीचे एक वेगळे स्थान निर्माण होत आहे, अशी माहिती पवार यांनी दिली.
वर्धापन दिनानिमित्त आयोजित स्पर्धेतील विजेते :
क्रिकेट :
मार्केटिंग विभाग (विजेते)
मशिन विभाग(उपविजेते)
क्रिकेट स्पर्धेतील विविध पारितोषिके :
- सामनावीर विनायक बावडेकर
- उत्कृष्ट फलंदाज उदय जाधव
- उत्कृष्ट गोलंदाज अमोल जाधव
- उत्कृष्ट झेल सागर तरडे
- उत्कृष्ट यष्टीरक्षक विनय मेमाणे
उत्तेजनार्थ बक्षीसे :
- बाबू गोळे
- २१ टीममधील एकमेव महिला खेळाडू - महिमा ठोंबरे
- मॅरेथॉन स्पर्धेत २१ कि.मी. अंतर पूर्ण करणारे लक्ष्मण विधाते
कॅरम एकेरी स्पर्धा (पुरुष) :
योगेश निगडे (विजेते)
घनश्याम जाधव (उपविजेते)
कॅरम एकेरी स्पर्धा (महिला) :
सारीका कदम (विजेते)
सुषमा जाधव (उपविजेते)
कॅरम स्पर्धा दुहेरी :
घनश्याम जाधव व योगेश निगडे (विजेते)
रमेश बोडके व राम शेळके (उपविजेते)
बुद्धिबळ स्पर्धा :
नीलेश देशमुख (विजेते)
राहुल वांजळे (उपविजेते)
15412
सकाळ कार्यालय, बुधवार पेठ : - ‘सकाळ’च्या ९१ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धेत विजेच्या ठरलेल्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रतापराव पवार यांच्यासह विविध स्पर्धेतील विजेते संघ.