विश्वास, जिव्हाळा दृढ करणारा सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विश्वास, जिव्हाळा दृढ करणारा सोहळा
विश्वास, जिव्हाळा दृढ करणारा सोहळा

विश्वास, जिव्हाळा दृढ करणारा सोहळा

sakal_logo
By

पुणे, ता. २ : नागरिकांचा दृढ विश्वास आणि जिव्हाळा यांच्या बळावर...अन्‌ हितचिंतक, पुणेकरांच्या साक्षीने ‘सकाळ’ने ९२ व्या वर्षात पदार्पण केले. पुणेकरांशी गेल्या ९१ वर्षांपासून असणाऱ्या दृढ नात्याची साक्ष देणारा ‘सकाळ’चा वर्धापन दिन रविवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्त मान्यवरांसह पुणेकरांनी ‘सकाळ’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. शिक्षण, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, कला-क्रीडा, प्रशासन, पोलिस अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांसह आपुलकीने आलेले असंख्य नागरिक या आनंद सोहळ्यात सहभागी झाले होते.
गेली अनेक दशके ‘सकाळ’वर भरभरून प्रेम करणाऱ्या पुणेकरांनी वर्धापन दिन सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला स्नेह व्यक्त केला. नव वर्षाचे स्वागत केल्यानंतर नागरिकांची पावले वळली ती ‘सकाळ’च्या बुधवार पेठेतील कार्यालयाच्या प्रांगणाकडे. अनेकांच्या जुन्या-नव्या गाठीभेटी या सोहळ्यानिमित्त झाल्या. वर्षानुवर्षे या सोहळ्यात हजेरी लावणाऱ्या मान्यवरांसह पुणेकरांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यंदा नव्या वर्षाची सुरवात रविवारी झाली खरी परंतु, रविवारचा सुटीचा दिवस असतानाही नागरिक मोठ्या संख्येने ‘सकाळ’च्या वर्धापनदिनाला उपस्थित होते. सूर्य मावळतीकडे झुकत असतानाच अनेकांची पावले ‘सकाळ’च्या प्रांगणाकडे वळू लागली आणि हळूहळू नागरिकांच्या गर्दीचा ओघ वाढला. या सोहळ्याचा आनंद उत्तरोत्तर वाढत गेला आणि हजारोंच्या संख्येने आलेल्या नागरिकांनी ‘सकाळ’ला शुभेच्छा दिल्या.