पुण्यातील गारठ्यात हळूहळू वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यातील गारठ्यात हळूहळू वाढ
पुण्यातील गारठ्यात हळूहळू वाढ

पुण्यातील गारठ्यात हळूहळू वाढ

sakal_logo
By

पुणे, ता. २ ः पुणे शहरातील किमान तापमानात गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने घट होत असून पुन्हा गारठ्यात हळूहळू वाढ होत आहे. दरम्यान मंगळवारी (ता. ३) निरभ्र वातावरणासह पहाटे धुक्याची शक्यता आहे. तसेच, पुढील तीन दिवसानंतर पुणे शहर आणि परिसरात थंडीत वाढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
सोमवारी (ता. २) शहरात १०.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. एकाच दिवसात पारा दोन अंशांनी घसरले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी ही गारठ्यासह पहाटे धुके अनुभवता येत आहेत. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन दिवस शहर व परिसरात किमान तापमानात काहीशी वाढ होणार आहे. त्यानंतर मात्र किमान तापमानाचा पारा घसरण्याची शक्यता आहे. तसेच किमान तापमान १० अंशांच्या खाली जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पुन्हा थंडीत वाढ होऊ शकते.
राज्यातील किमान तापमानात घट झाल्याने उत्तर महाराष्ट्रासह उत्तर मराठवाड्यात थंडी आहे. यामुळे निफाड, धुळे, औरंगाबाद, जळगाव, नाशिक, पुणे येथे थंडी वाढली आहे. उर्वरित राज्यातही किमान तापमानाचा पारा घसरला आहे. सोमवारी राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद निफाड येथे ७.६ अंश सेल्सिअस झाली. तर औरंगाबाद येथे ९.४ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. पुणे, जळगाव आणि नाशिक येथे तापमान १० अंशांच्या घरात होते. राज्याच्या बऱ्याच भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा एक ते दोन अंशांनी घट झाली होती.