Wed, Feb 1, 2023

शिवाजीनगर, कोथरूड डेपो परिसरातील पाणी बंद
शिवाजीनगर, कोथरूड डेपो परिसरातील पाणी बंद
Published on : 2 January 2023, 3:49 am
पुणे, ता. २ ः कामगार पुतळा येथे मेट्रोकामामुळे जलवाहिनी स्थलांतरित केली जाणार आहे. तर, चांदणी चौकात जलवाहिनी दुरुस्ती करण्यात येणार असल्याने शिवाजीनगर आणि कोथरूड डेपो परिसरातील पाणी पुरवठा गुरुवारी (ता. ५) बंद ठेवला जाणार आहे. शुक्रवारी (ता. ६) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे पाणी पुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे.
या भागातील पाणी पुरवठा बंद असेल ः कामगार पुतळा, सिव्हिल कोर्ट, कपोते गल्ली, सिमला आॅफिस परिसर, मोदीबाग परिसर, नरवीर तानाजी वाडी, पुणे मुंबई रस्ता, वाकडेवाडी, पाटील इस्टेट, कोथरूडमधील शास्त्रीनगर, लोकमान्य कॉलनी, उजवी व डावी भुसारी कॉलनी, वेद भवन रस्ता व परिसर, डुक्करखिंड, हिलव्हिव सोसायटी, वड्स रॉयल सोसायटी, परमहंसनगर, लक्ष्मीनगर, राहुल टॉवर, मुठेश्वर कॉलनी, गुरुजन सोसायटी.