सांधेदुखीच्या आजारावर टेब 
ट्रिटमेंटचे आयुर्वेदिक उपचार

सांधेदुखीच्या आजारावर टेब ट्रिटमेंटचे आयुर्वेदिक उपचार

Published on

तूर्तास बातमी मागे ठेवणे, निरोप आल्याशिवाय वापरू नये

पुणे, ता. ४ : सांधेदुखीच्या वेदनेतून मुक्ती मिळवून पुन्हा पहिल्यासारखं ठणठणीत व्हायचं आहे? तर ‘टेब ट्रिटमेंट क्लिनिक्स’चे शुद्ध आयुर्वेदिक उपचार सांधेदुखीवर मात करतील.

सांधेदुखीच्या त्रासातून कायमची आणि लवकरात लवकर सुटका व्हावी, यासाठी संशोधन करून प्रत्येकासाठी स्वतंत्र आणि अनोखी उपचारपद्धती ‘टेब ट्रिटमेंट क्लिनिक्स’ने विकसित केली आहे. या उपचारपद्धतीची सुरवात १९९१ मध्ये झाली. डॉ. टेब आणि डॉ. रुस्तम बी. जिनवाला यांनी पुण्यात ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक’ ची स्थापना केली. सुमारे ३७ वर्षांपासून पुण्यातील ढोले पाटील रोडला ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक’ची शाखा असून डॉ. मंजूषा अवस्थी यांच्या नेतृत्वाखाली ती कार्यरत आहे.

सांध्यांचे दुखणे, आमवात, संधिवात, गुडघेदुखी, मणक्याचे आजार, स्पाँडिलायटिस अशा सर्व प्रकारच्या स्नायूंशी संबंधित आजारांवर ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’मध्ये उपचार होतात. ते करताना रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती, पचनशक्ती, त्याची शारीरिक-मानसिक स्थिती याही गोष्टी लक्षात घेतल्या जातात. त्यानंतरच स्वतंत्रपणे प्रत्येक रुग्णाचे औषध तयार केले जाते. उपचार सुरू करतानाच ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’चे तज्ज्ञ डॉक्टर’ किती कालावधीत पूर्णतः बरे होणार, हे लेखी स्वरूपात लिहून देतात. शिवाय उपचारांसाठी किती खर्च येईल, हेही अगोदरच सांगतात. ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’मध्ये उपचार ओपीडी बेसिस पद्धतीनं घेता येतात. दोन महिन्यातून एकदा रुग्णाला ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’ मध्ये यावं लागतं. रविवारी आणि संध्याकाळनंतरही क्लिनिक सुरू असतं. ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’ आठवड्यातील सातही दिवस सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत चालू असतात. मात्र येथे अपॉईंटमेंट घेऊन यावे लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com