अनाथ आश्रमातील मुलांना कपडे, पुस्तके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनाथ आश्रमातील मुलांना कपडे, पुस्तके
अनाथ आश्रमातील मुलांना कपडे, पुस्तके

अनाथ आश्रमातील मुलांना कपडे, पुस्तके

sakal_logo
By

पुणे, ता. ५ ः नववर्षानिमित्त कृष्णप्रिया आणि प्रतिभा फाउंडेशनतर्फे नसरापूरजवळील माऊली अनाथ आश्रमातील मुलांना कपडे आणि पुस्तके भेट देण्यात आली. यावेळी कृष्णप्रिया फाउंडेशनच्या अध्यक्षा कविता गिरी- शिंपी आणि प्रतिभा फाउंडेशनचे इतर सदस्य शारदा परदेशी, तसेच चेतन परदेशी, सौरभ नाळे, श्रीराज लोणकर, रुपेश शिंदे, साई पंडित आदी उपस्थित होते. यंदा जास्तीत जास्त गरीब-अनाथ मुलांना मदत करण्याचा मानस फाउंडेशनच्या संचालकांनी बोलून दाखवला. मुलांनी भजन, कीर्तन आणि पोवाड्यांचे सादरीकरण केले.