Sun, Feb 5, 2023

दक्षिण मुख्यालय प्रमुखांची
राज्यपाल, मुख्यमंत्र्यांशी भेट
दक्षिण मुख्यालय प्रमुखांची राज्यपाल, मुख्यमंत्र्यांशी भेट
Published on : 5 January 2023, 1:43 am
पुणे, ता. ५ ः दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल ए. के. सिंह यांनी गुरुवारी (ता. ५) राज्यपाल व मुख्यमंत्र्यांची मुंबई येथे भेट घेतली. भविष्यात उद्भवणाऱ्या आव्हानांना उत्तर देण्यासाठी दक्षिण मुख्यालयातर्फे केली जाणारी तयारी, याबाबत त्यांनी माहिती दिली. मानवतावादी साहाय्य आणि आपत्ती निवारण (एचएडीआर) परिस्थिती आणि राज्यातील माजी सैनिकांच्या समस्यांविषयी एकत्रित प्रयत्नाच्या मुद्यांवर यावेळी लेफ्टनंट जनरल सिंह यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. राज्यात नुकत्याच सुरू झालेल्या अग्निपथ योजनेच्या अंमलबजावणी संदर्भातील समस्यांवरही त्यांनी लक्ष वेधले.