
समकालीन बदलांचा व्यवसायांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणे गरजेचे
समकालीन बदलांचा अभ्यास करणे गरजेचे
गिरीश चितळे यांचे मत; ‘एमसीसीआयए’च्यावतीन विविध पुरस्कारांचे वितरण
पुणे, ता. ५ : ‘‘व्यवसाय वाढवायचा असेल तर पुढील किमान १० वर्षांचा अंदाज घेता आला पाहिजे. मात्र समकालीन बदलांमुळे अनेक इंडस्ट्रीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याचा समाज, तसेच उद्योजकांच्या दृष्टिकोनातून अधिक अभ्यास करणे गरजेचे आहे,’’ असे मत चितळे उद्योग समुहाचे भागीदार गिरीश चितळे यांनी व्यक्त केले.
‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर’तर्फे (एमसीसीआयए) देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण गुरुवारी (ता. ५) चितळे यांच्या हस्ते करण्यात आले. बालगंधर्व रंगमंदिरात हा सोहळा पार पडला. एमसीसीआयएचे अध्यक्ष दीपक करंदीकर आणि महासंचालक प्रशांत गिरबने यावेळी उपस्थित होते.
चितळे म्हणाले, ‘‘पूर्वी दोन ते तीन पिढ्या व्यवसाय उभा करण्यात जात. मात्र आता एका पिढीच्या अर्ध्या वयातच कंपनी कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करीत आहे. अनेक स्टार्टअप पाच वर्षात युनिकॉर्न झाले. व्यवसायांच्या अनेक अंगाचा आवाका बदलत असल्याचे यातून स्पष्ट होते. त्यामुळे खर्च करण्याच्या बाबतीत आपल्यात कोणते बदल झाले आहेत, याची नोंद घेत त्यावर अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी एमसीसीआयएने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा चितळे यांनी व्यक्त केली. गिरबने यांनी पुरस्कारांची भूमिका विशद केली.
पुरस्कार आणि विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे :
इनोव्हेशन इन आंत्रप्रेन्युअरशिपसाठीचा गो. स. पारखे पुरस्कार :
येलसन इंडिया प्रा. लि., एएफइसीओ हीटिंग सिस्टम, टेकएरा इंजिनिअरिंग (आय) प्रायव्हेट लिमिटेड, सॅसपॅक व्हेंचर्स प्रा. लि., फाइन हँडलिंग अँड ऑटोमेशन प्रा. लि.
नावीन्यपूर्ण उत्पादन आणि सेवांसाठी प्रशंसा प्रमाणपत्र :
सिटोटो डिजिटल पर्सनॅलिटी प्रा. लि. आणि यु फॉर यु सोशियोटेक प्रा. लि.
नवीन उत्पादने आणि डिझाइनसाठी पुरस्कार (कै. हरी जोशी आणि कै. मालिनी जोशी यांच्या स्मरणार्थ ) :
मार्क डिझाईन सोल्यूशन्स प्रा. लि., ख्याती इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि., स्पेसमॅक्स इंडोर सोल्यूशन प्रा. लि.
महिला उद्योजकांसाठी पुरस्कार (कै. श्रीमती रमाबाई जोशी यांच्या स्मरणार्थ ) :
मेटामॅजिक कॉम्पुटिंग प्रा. लि.
सर्वोकृष्ट कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठीचा बी.जी. देशमुख पुरस्कार :
गरवारे फुलफ्लेक्स इंडिया प्रा. लि., कल्याणी टेक्नोफोर्ज लि., विश्वगुरू इन्फोटेक प्रा. लि.
संरक्षण क्षेत्रातील उत्पादनातील एमएसएमईसाठी ब्रिगेडियर एस. बी. घोरपडे पुरस्कार :
इलेक्ट्रोप्युमॅटिक्स अँड हायड्रॉलिक्स प्रा.लि., डायनालॉग इंडिया लिमिटेड, पीएचआय ऑडिओकॉम सिस्टिम्स प्रा. लि.
पहिल्या पिढीतील यशस्वी उद्योजकासाठी एमसीसीआयए स्वर्गीय किरण नातू उद्योगजकता पुरस्कार (कै. श्री. किरण नातू यांच्या स्मरणार्थ ) :
सेटको स्पिंडल्स इंडिया प्रा. लि., लॉजिकॉन टेक्नोसोल्यूशन्स प्रा. लि., क्लीनटेक सिस्टम्स प्रा. लि.
हाराष्ट्रातील हरित उपक्रमासाठी डॉ. आर. जे. राठी पुरस्कार (डॉ. आर. जे. राठी चॅरिटी ट्रस्ट द्वारा स्थापित) ः
डाळी आणि समीर इंजिनिअर प्रा. लि., पर्सिस्टंट सिस्टम्स लि., ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया
PCT23B11376