Sun, Jan 29, 2023

आंबेगाव, धनकवडीत अतिक्रमणांवर कारवाई
आंबेगाव, धनकवडीत अतिक्रमणांवर कारवाई
Published on : 5 January 2023, 4:01 am
पुणे, ता. ४ ः आंबेगाव बुद्रुक व धनकवडी येथील सुमारे १४ हजार चौरस फूट अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने गुरुवारी कारवाई केली. महापालिकेच्या बांधकाम विभागाच्यावतीने अनधिकृत बांधकामधारकांना महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानुसार ५२ (१) (अ) व कलम ५३ (१) (अ) नुसार नोटीस बजावण्यात आली होती. आंबेगाव बुद्रुक येथील सर्व्हे क्रमांक ७,१२ व १० येथील विना परवाना बांधकामधारकांना नोटीस बजावून तेराशे चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले. तर आंबेगाव बुद्रुक व धनकवडी येथील १४ हजार ३७० चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले. आंबेगावमधील भोलेनगर येथील १२ हजार ५०० चौरस फूट क्षेत्र अतिक्रमण कारवाई करून काढण्यात आले. याच पद्धतीने अन्य ठिकाणांवरही बांधकाम विभागाने कारवाई केली.