निधीबाबत भाजपकडून दिशाभूल ः तिवारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधीबाबत भाजपकडून दिशाभूल ः तिवारी
निधीबाबत भाजपकडून दिशाभूल ः तिवारी

निधीबाबत भाजपकडून दिशाभूल ः तिवारी

sakal_logo
By

पुणे, ता. ४ ः महाविकास आघाडीच्या काळातच स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांच्या भव्य स्मारकासाठी २६९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून भुमी संपादन करण्याचे काम हाती घेण्यात आले. त्याचे श्रेय महाविकास आघाडीस मिळू नये, यासाठीच महाविकास आघाडीतील नेत्यांविषयी भाजपकडून दिशाभूल केली जात आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली.
तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये वढू बुद्रुक येथील संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी निधीची मंजुरी दिली होती. स्मारक बांधण्याची व त्यांच्या नावे शौर्य पुरस्कार देण्याचीही घोषणा त्यांनी केली होती. परंतु भाजप सरकारकडून काहीतरी कुरापती काढून महाविकास आघाडी व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा अवमान करीत आहेत, तसेच संभाजी महाराज यांच्या स्मारकाचे श्रेय लाटण्यासाठी भाजप नेते दिशाभूल करत असल्याचेही तिवारी यांनी नमूद केले आहे.