रंगोलीच्या फॅशन फेस्टीवलाचा आज शेवट दिवस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रंगोलीच्या फॅशन फेस्टीवलाचा आज शेवट दिवस
रंगोलीच्या फॅशन फेस्टीवलाचा आज शेवट दिवस

रंगोलीच्या फॅशन फेस्टीवलाचा आज शेवट दिवस

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : ‘फॅशन व लाइफस्टाईल एक्झिबिशन रंगोली’ ही प्रदर्शनी पुन्हा एकदा पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. फॅशनेबल विअरची धूम करणारे हे प्रदर्शन सिद्धी बॅनक्वेट येथे रविवार (ता. ८) पर्यंत सुरू राहणार आहे. या दोन दिवसीय प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी लोकांचा भव्य प्रतिसाद लाभला.
या प्रदर्शनात लग्नासाठीच्या कलेक्शनचा अनोखा संगम सादर करण्यात आला आहे. प्रदर्शनात देशातील विविध शहरातील प्रसिद्ध स्टॉल धारक सहभागी झाले आहेत. महिलांसाठी खास सण-सोहळे, लग्नासाठीचे तसेच इन्डो-वेस्टर्न कपडे, दाग-दागिणे, फूटवेअर, हेअर एक्सेसरीजपासून ते गृह सजावटीच्या आकर्षक वस्तू या प्रदर्शनात उपलब्ध आहेत. या प्रदर्शनामध्ये मुंबई, कोलकता, नागपूर, दिल्ली, जयपूर, इंदौर, बनारस, चंडीगड, चेन्नई, सुरत, कानपूर, लखनौ आणि रायपूर येथील डिजाइनर्स आणि जवळपास ८० पेक्षा जास्त स्टॉल आहेत. यापूर्वी अकोला, अमरावती, भोपाळ, बेळगाव, हुबळी, जळगाव, भुवनेश्वर आदी ठिकाणी या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. हे प्रदर्शन रविवारपर्यंत (ता. ८) सिद्धी बॅनक्वेट, डीपी रोड, म्हात्रे ब्रिज जवळ, वकील नगर, एरंडवणे येथे सुरू राहणार आहे.