मोझे शिक्षण संस्थेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोझे शिक्षण संस्थेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
मोझे शिक्षण संस्थेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

मोझे शिक्षण संस्थेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : येरवडा येथील गेनबा सोपानराव मोझे संस्थेच्या विविध शाखातील एकूण ४३ विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. या शिष्यवृत्ती परीक्षेत संस्थेच्या गेनबा सोपानराव मोझे माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेतील एकूण सहा विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झाले असून, सुंदर बाई मराठे विद्यालय खराडी या शाळेतील इयत्ता पाचवीतील शिष्यवृत्तीसाठी एकूण १३ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झाले आहेत, तर इयत्ता आठवी शिष्य वृत्ती परीक्षेमध्ये एकूण १२ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत. श्री सायाजी नाथ महाराज विद्यालयाचे एकूण १२ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ मोझे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मोझे, शाळा समिती अध्यक्ष अलका पाटील, संजय मोझे यांनी मुख्याध्यापक पर्यवेक्षक, मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.


पुणे, ता. १२ ः ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या १०० व्या स्मृती शताब्दी पर्व महोत्सवानिमित्त सोसायटीने देशातील विविध ठिकाणी असलेल्या १२ ज्योतिर्लिंगांमागील पौराणिक कथांचे वर्णन करणारा लेजंड्स ऑफ ज्योतिर्लिंग’ या मेगा डान्स ड्रामाला मोठा प्रतिसाद मिळाला.
या कथा भारतातील विविध राज्यांतील संस्कृती, नृत्य, संगीत, पोशाख, भारताच्या राष्ट्रीय कलांच्या उत्थानासाठी सुनैना सोसायटीने सादर केला. भगवान शिवाच्या पौराणिक कथा लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी १२ ज्योतिर्लिंगांच्या कथा सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे सादर केल्या जात आहेत. संकल्पना, संशोधन दिग्दर्शन आणि दिल्लीचे सुधाकर व नृत्यदिग्दर्शन अतुल कुमार यांच्या दिग्दर्शनाखाली लाइट साऊंडच्या माध्यमातून अप्रतिम असे भारतातील १२ ज्योतिर्लिंगे म्हणजे सोमनाथ, नागेश्वर, भीमाशंकर, त्रिंबकेश्वर, ग्रिष्णेश्वर, वैद्यनाथ, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, कशी विश्वनाथ, केदारनाथ, रामेश्वरम आणि मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे नृत्यनाट्याच्या रूपात चित्रण करण्यात आले. या कार्यक्रमात दिल्लीच्या प्रसिद्ध भरत नाट्यम कलाकार कनक सुधाकर यांना व त्याचबरोबर सर्व उपस्थित कलाकारांना स्मृती चिन्ह देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाला ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीचे सहसचिव सुरेश प्रताप शिंदे, खजिनदार अजय पाटील व सोसायटीचे भगवानराव साळुंखे, राहुल यादव, श्रीकांत मोझे उपस्थित होते. ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीचे मानद सचिव मालोजीराजे छत्रपती आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. बोरमणे यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सर्वांचे अभिनंदन व कौतुक केले.