लोणावळ्यातील वाहतुकीसाठी आराखडा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या सूचना ः समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोणावळ्यातील वाहतुकीसाठी आराखडा करण्याच्या सूचना

जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या सूचना ः समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी
लोणावळ्यातील वाहतुकीसाठी आराखडा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या सूचना ः समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी

लोणावळ्यातील वाहतुकीसाठी आराखडा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या सूचना ः समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी

sakal_logo
By

पुणे, ता. १३ : लोणावळा शहराची सर्व अर्थव्यवस्था पर्यटनावरच अवलंबून असल्यामुळे तेथील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करावी. तसेच वाहतूक समस्येविषयी शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करून आठवडाभरात वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली लोणावळा नगरपरिषद कार्यालयाच्या स्थायी समिती सभागृहात शहरातील वाहतूक समस्येवरील उपाययोजनेबाबत बैठक पार पडली. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, मुळशी-मावळचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के, मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील आदी उपस्थित होते.

याठिकाणी होतेय वाहतूक कोंडी
लोणावळा शहर पोलिस पोलिसांनी वाहतुकीची व पार्किंगची समस्या आणि त्यावरील उपाय योजनांची विस्तृत माहिती दिली. पुणे व मुंबई या शहरांच्या मध्यवर्ती, असे लोणावळा शहर असल्याने पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे अपोलो गॅरेज ते भारत पेट्रोलियम पंप वळवण या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. यासाठी पर्यायी मार्ग सूचविण्यात आले.

बैठकीत या विषयांवर चर्चा
-कुमार चौक ते भांगरवाडी रस्ता रुंदीकरण,
-शहरातील व मुंबई पुणे महामार्गावरील रिक्षा स्थानकाचे नियोजन करणे,
-संबंधितांना पर्यायी जागा उपलब्ध करून देणे,
-वाहनांसाठी पुरेशी पार्किंग व्यवस्था नगरपरिषदेने उपलब्ध करणे,
-सिग्नल यंत्रणा सुरु करणे, नवीन सिग्नल बसविणे, भटकी जनावरे,
-अनधिकृत फेरीवाले, भाजी विक्रेते यांचा बंदोबस्त करणे,
-भांगरवाडी व खंडाळा येथील ओव्हर ब्रीज बसविणे,
-लोणावळा शहरातील बस स्थानकासाठी शहराबाहेर स्थलांतरित करणे,
व्यापारी वर्गाकरिता लोडिंग-अनलोडिंग वेळ निश्‍चित करणे


अडीअडचणी समजून घ्यावेत
शहरातील वाहतूक समस्येबाबत व्यापारी संघटना, सामाजिक संस्था, रिक्षा संघटना आदींसोबत नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांनी बैठक घेऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घ्याव्यात. कुसगाव टोल नाका आणि वरसोली टोल नाका या दोन्ही नाक्‍यावर नागरिकांना पथकर भरावा (टोल) लागत असल्यामुळे याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.