शिंदे छत्री येथे पानिपत शौर्यदिनाचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिंदे छत्री येथे पानिपत शौर्यदिनाचे आयोजन
शिंदे छत्री येथे पानिपत शौर्यदिनाचे आयोजन

शिंदे छत्री येथे पानिपत शौर्यदिनाचे आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : वानवडीमधील श्रीमंत महाराज महादजी शिंदे छत्री येथे १४ जानेवारी रोजी २६३ व्या पानिपत शौर्यदिनाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आणि उद्योजक उत्तमराव शिंदे-सरकार यांनी ही माहिती दिली. पुण्यात शौर्यदिनाचे हे तिसरे वर्ष असून, शनिवारी दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमास खास ग्वाल्हेर येथून महादजी शिंदे यांचे वंशज युवराज महाआर्यमन जोतिरादित्य शिंदे उपस्थित राहणार आहेत. तसेच, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून २७ वर्षांपासून पानिपत येथे शौर्यदिन साजरा केला जातो. याच धर्तीवर पुण्यात शिंदे छत्री येथे शौर्यदिनाचे आयोजन करण्यात आले आहे. पानिपत येथील पवित्र भूमीतील जल आणि मातीच्या कलशाचे पूजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, कृषी तज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, कर्नल (निवृत्त) सुरेश पाटील, इतिहास तज्ज्ञ पांडुरंग बलकवडे, धर्मादाय सहआयुक्त सुधीरकुमार बुक्के, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, अतिरिक्त पोलिस आयुक्त नामदेवराव चव्हाण, ‘नॅशनल हेवी इंजिनिअरिंग’चे चेअरमन संग्रामसिंह नलावडे, ‘एमआयटी’चे कार्यकारी उपाध्यक्ष डॉ. मंगेश कराड, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहराध्यक्ष नाना भानगिरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिक्षण उपसंचालक विलास कदम उपस्थित राहणार आहेत. या वेळी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिंदे-सरकार, सिंधिया देवस्थानचे अधीक्षक यशवंत भोसले आणि शौर्यदिन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.